No one will be able to erase my name from Samrudhi Highway – Devendra Fadnavis
समृद्धी महामार्ग मधून कोणीही माझं नाव मिटवू शकणार नाही – देवेंद्र फडणवीस
नागपूर : समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालं, तर आनंद होईल. मात्र त्याचं कार्य पूर्ण केल्यानंतर उद्घाटन केलं तर जास्त बरं होईल. कारण काम पूर्ण न करता उद्घााटन केलं, तर समृद्धी महामार्गाचं महत्त्व कमी होईल.
मात्र त्याचं उद्घाटन कधी ही केलं तरी आनंदच होईल,असं विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते.
कोणी कितीही प्रयत्न केले तरी समृद्धी महामार्ग मधून माझं नाव मिटवू शकणार नाही, गेले वीस वर्ष ही संकल्पना माझ्या डोक्यात होती. जेव्हा राज्याच्या जनतेनं मुख्यमंत्री म्हणून संधी दिली तेव्हा हा महामार्ग बांधला.
मला आनंद या गोष्टीचा आहे की तेव्हा समृद्धी महामार्गाला जे लोक विरोध करत होते आज तेच लोकं श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाची तयारी करत आहेत, असंही ते म्हणाले.
Hadapsar News Bureau.