The central government has clarified that it does not intend to increase the minimum rate of GST from 5 per cent to 8 per cent
जीएसटीचा किमान दर 5 टक्क्यांवरुन 8 टक्के करण्याचा विचार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचा किमान दर 5 टक्क्यांवरुन 8 टक्के करणाच्या वृत्ताचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. काही प्रसारमाध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्रा असा कोणताही प्रस्ताव नसून या बातमीत तथ्य नाही, असं उच्चपदस्थ सरकारी सूत्रांनी सांगितलं.
सध्या, जीएसटीमध्ये 5, 12, 18 आणि 28 टक्के अशी चार-स्तरीय रचना आहे. याशिवाय सोनं आणि सोन्याच्या दागिन्यांवर तीन टक्के कर लागतो. गेल्या वर्षी, GST परिषदेनं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्री गट स्थापन केला होता.
यामध्ये पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा, केरळचे अर्थमंत्री के.एन. बालगोपाल आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांचा समावेश होता. दर निश्चितीसाठी या मंत्रीगटाची स्थापना करण्यात आली आहे.
या मंत्रीगटानं अद्याप यासंदर्भातला अहवाल तयार केलेला नाही आणि तो GST कौन्सिलला सादर करायचा आहे.
जीएसटी कौन्सिलच्या पुढील बैठकीची तारीखही निश्चित करण्यात आलेली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Hadapsar News Bureau