One country one voter list will take appropriate steps
विविध प्रस्ताव आणि सूचनांवर विचार करून एक देश एक मतदार यादीबाबत योग्य ती पावलं उचलणार असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली : विविध प्रस्ताव आणि सूचनांवर विचार करून एक देश एक मतदार यादीबाबत योग्य ती पावलं उचलणार असल्याचं सरकारनं आज सांगितलं. लोकसभेत लेखी उत्तर देताना, विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली.
निवडणूक प्रक्रिया अधिक जबाबदार आणि पारदर्शक करण्यासाठी संबंधीतांबरोबर चर्चा केल्यानंतर केंद्र या प्रकरणाचा विचार करेल. निवडणूक सुधारणा ही निरंतर आणि चालू असलेली प्रक्रिया आहे, असंही ते म्हणाले.
अनिवासी भारतीयांना प्रातिनिधीक स्वरुपात मतदान करायला परवानगी देण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारनं आज स्पष्ट केलं.
विधी आणि न्यायमंत्री किरण रिजीजू यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. अनिवासी भारतीयांना अशी सवलत देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे काय़ या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com