One-year extension of restriction on sugar export by the central government
केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवरच्या निर्बंधांना एक वर्षाची मुदतवाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर घातलेल्या निर्बंधांची मुदत येत्या ३१ तारखेपासून आणखी एक वर्षानं वाढवली आहे. देशांतर्गत बाजारातून साखरेची उपलब्धता वाढावी, आणि साखरेचा भाव नियंत्रणात रहावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे.
कच्च्या, रिफाइन्ड, आणि पांढऱ्या साखरेवर ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत हे निर्बंध कायम राहतील, असं परदेशी व्यापार महासंचालनालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. युरोपिय संघ आणि अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या साखरेवर हे निर्बंध लागू नसतील, असं त्यात स्पष्ट केलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com