Opportunity to apply for loan case under Chief Minister’s Employment Creation Programme
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत कर्ज प्रकरणासाठी अर्ज करण्याची संधी
पुणे : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत (एमसीईडी) पात्र प्रशिक्षणार्थीसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत उत्पादन, प्रक्रिया, सेवा व उद्योग कर्ज प्रकरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींनी https://maha-cmegp.gov.in/onlineapplication या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार निर्मिती, स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि उद्योग व्यवसायाबाबतची माहिती मिळण्यासाठी उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत योजनेसाठी पात्र उमेदवारांची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मार्गदर्शक सूचनाही संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
एमसीईडी सर्व प्रशिक्षणार्थीचे कर्ज प्रकरण भरुन घेण्यात येत आहेत. त्यातील प्रकल्प अहवाल व हमीपत्राचा (अंडरटेकिंग) नमुना याची प्रिंट प्रशिक्षणार्थीनी आपल्यासोबत ठेवणे व भरून घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. एमसीईडीद्वारे अर्ज भरल्याचा दिनांक व नावाप्रमाणे यादी लेखी स्वरूपात जिल्हा उद्योग केंद्र अथवा महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ येथे देण्यात येणार असून त्याची स्थळप्रत प्रशिक्षणार्थ्याने आपल्याजवळ पोचस्वरुपात ठेवणे गरजेचे आहे.
कर्जप्रकरणासाठी इच्छुक प्रशिक्षणार्थी अथवा प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी एमसीईडीचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी शशिकांत कुंभार यांच्याशी ९४०३०७८७५२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com