विरोधक नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा उदय सामंत यांचा दावा

मंत्री उदय सामंत Minister Uday Samant हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

Uday Samant claims that the opposition is trying to mislead the citizens

विरोधक नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा उदय सामंत यांचा दावा

मुंबई :  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं टाटा-एअरबस सी-२९५ हा लष्करी वाहतूक करणाऱ्या विमाननिर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाऊ दिल्याचा आरोप करून विरोधक केवळ नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकल्पासाठी केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच सामंजस्य झाला होता, असा दावाही त्यांनी केला.

मंत्री उदय सामंत Minister Uday Samant हडपसर मराठी बातम्या Hadapsar News
file Photo

उदय सामंत पुढे म्हणाले की, एक वर्षापूर्वी हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर त्यावेळच्या सरकारने कोणतंही पत्र लिहिलं नाही. हा प्रकल्प परत यावा यासाठी कोणताही प्रयत्न केला गेला नाही. त्यामुळे एक वर्षापूर्वी गेलेला प्रकल्प आता गेला असल्याचं सांगत विरोधक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करतात.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते असताना महाविकास आघाडी सरकारला, या प्रकल्पासंदर्भात प्रस्ताव तयार करुन तो केंद्रापुढे मांडण्याची विनंती केली होती, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही, असंही ते म्हणाले.

फॉक्सकॉन आणि आताचा प्रकल्प हा गेल्या सरकारच्या काळात गुजरातमध्ये गेला आहे. पण राज्यातील युवकांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. एखादा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रात नऊ लॉजिस्टिक पार्कसह मोठी गुंतवणूक होईल आणि त्यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील असं आश्वासनही उदय सामंत यांनी यावेळी दिलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *