Our demand is that there should be a uniform civil law – Raj Thackeray
समान नागरी कायदा झाला पाहिजे ही आपली मागणी
– राज ठाकरे
सिंधुदुर्ग : समान नागरी कायदा झाला पाहिजे ही आपली मागणी असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज सिंधुदुर्ग दौऱ्यात कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग इथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर कुडाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.
समान नागरी कायदा हा केंद्राचा अधिकार आहे, कोणतंही एक राज्य यावर निर्णय घेऊ शकत नाही, असं ते म्हणाले.
चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या इतिहासावरून उठालेल्या गदारोळावरही त्यांनी भाष्य केलं. राज्यात जातीपातीच्या राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमुळे झाली असल्याची टीका त्यांनी केली.
दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी कुडाळमध्ये येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com