शिक्षकांनी स्वतःचे ज्ञान,व्यासंग वाढवून उत्तम पिढी घडवावी 

साधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Teachers should increase their own knowledge and interests to create a strong India and a better generation

शिक्षकांनी स्वतःचे ज्ञान,व्यासंग वाढवून समर्थ भारत आणि उत्तम पिढी घडवावी : किसन रत्नपारखी

रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयातील उपशिक्षिका सुनंदा साळुंखे 31 मे 23 रोजी प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त

हडपसर : शिक्षक जगातील सर्वोत्तम गोष्टी घडवत असतो. राष्ट्र घडविण्याची जबाबदारी समाजाने शिक्षकांवर सोपवली आहे.समाजाचा,विद्यार्थ्यांचा शिक्षक हा मार्गदर्शक असतो. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःचे ज्ञान,व्यासंग वाढवून समर्थ भारत आणि उत्तम पिढी घडवावी असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी यांनी केले.Rayat Shikshan Sanstha, Satara

रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयातील उपशिक्षिका सुनंदा साळुंखे आपल्या प्रदीर्घ सेवेतून 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या सेवानिवृत्ती कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा देताना किसन रत्नपारखी बोलत होते. या प्रसंगी सेवानिवृत्त होणाऱ्या सुनंदा साळुंखे यांना विद्यालयाच्या वतीने संपूर्ण पोषाख देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सहविभागीय अधिकारी शंकर पवार ,आजीव सभासद व साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव,माजी विभागीय अधिकारी चंद्रकांत जाधव ,समन्वय समिती सदस्य विजय शितोळे, वाल्हे शाखेचे मुख्याध्यापक अब्दूलगफारखान पठाण,निरा शाखेच्या मुख्याध्यापिका पासलकर मॅडम,विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते ,कुमार बनसोडे, माधुरी राऊत ,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे,माजी मुख्याध्यापक गणपतराव साळुंखे, सत्कारमूर्तींचे कुटुंबिय -नातेवाईक, शाखेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,आजी माजी रयत सेवक उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सहविभागीय अधिकारी शंकर पवार शुभेच्छा देताना म्हणाले शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून अध्यापन करावे. आपल्यावर समाज घडविण्याची जबाबदारी आहे या भूमिकेतून आपले कर्तव्य पार पाडावे. विद्यार्थ्यांना शिकवताना काळाच्या प्रवाहात राहून स्वतःही नवनवीन गोष्टी शिकाव्यात.

माजी विभागीय अधिकारी चंद्रकांत जाधव यांनीही सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले,बदलत्या शैक्षणिक धोरणांचा आणि नवनवीन शैक्षणिक साधनांचा वापर करून प्रभावी अध्यापन करून केवळ परीक्षाधिष्ठीत विद्यार्थी न घडवता विद्यार्थ्यांना जीवनशिक्षण द्यावे. आपल्या कामाकडे केवळ नोकरी म्हणून न पाहता कर्तव्य म्हणून पाहावे.

शिक्षकांच्या वतीने हसीनाबानू पठाण आणि नातेवाईकांच्या वतीने हर्षदा घाडगे यांनीही शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.आभार पर्यवेक्षक कुमार बनसोडे यांनी मानले तर सूत्रसंचालन अनिल वाव्हळ व ज्ञानेश्वर सरोदे यांनी केले.. रयतगीत व पसायदान संगिता शिंगाणा व कारभारी देवकर यांनी सादर केले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *