P. L. Deshpande the Maharashtra Art Festival organized
१२ ते २० नोव्हेंबर पर्यंत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवाचं आयोजन
मुंबई : ‘जीवन सुंदर आहे‘ या संकल्पनेसह दिनांक १२ ते २० नोव्हेंबर २०२२ असे एकूण ९ दिवस पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रभूषण पु.ल.देशपांडे यांचा ८ नोव्हेंबर च्या जन्मदिनाचं औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरु कलाकारांना आपली कला सादर करता यावी यासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येतो.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महोत्सवाच्या नियोजनाबाबत माहिती सांगताना म्हणाले की, हा महोत्सव पु.ल. देशपांडे यांना भावार्थ पुष्पांजली अर्पण करणारा असून या महोत्सवात विविध कार्यक्रम, स्टॉल्स तसेच उपक्रम असणार आहे.
या महोत्सवांची सुरूवात तारपा आदिवासी नृत्याने होत असून अकादमीची निर्मिती असणाऱ्या आणि अण्णा भाऊ साठे लिखित, शिवदास घोडके दिग्दर्शित ‘मुंबई कोणाची’ या नाटकाचं सादरीकरण यावेळी करण्यात येईल. पु.ल. देशपांडे आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या विषयी पंडित भीमसेन जोशींचे शिष्य पंडित उपेंद्र भट हे आठवणी सांगून काही गाण्यांचे सादरीकरण करणार आहेत.
१४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, बालचित्रपट महोत्सव असणार आहे.
या वर्षी पहिल्यांदाच आदिवासी भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याकरता या महोत्सवात आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच अंध, अपंग आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांनाही कला सादरीकरणाकरता निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना काही दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात आहे.
पु.लं. देशपांडे कला महोत्सवात नवोदितांना संधी देण्याचे धोरण असल्याने ज्यांनी मागील तीन वर्षात एकाही महोत्सवात मानधन घेतलेले नाही अशा कलाकारांना प्राधान्य देण्यात आले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com