Padma Award 2023 Nominations open till September 15
पद्म पुरस्कार २०२३ साठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर
नवी दिल्ली : भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आलेल्या ‘ पद्म पुरस्कार २०२३ साठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
पद्म पुरस्कारसाठीचे नामांकन आणि शिफारसी केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवरूनच Rashtriya Puruskar Portal (https://awards.gov.in) .स्वीकारल्या जातील असं गृह मंत्रालयानं कळवलं आहे. पुढच्या वर्षी प्रजासत्ताकदिनी हे पुरस्कार प्रदान केले जातील.
पद्म पुरस्कार, म्हणजे, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये स्थापन झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त केली जाते.
हा पुरस्कार विशिष्ट कार्य ओळखण्याचा प्रयत्न करतो आणि सर्व क्षेत्रातील विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरीसाठी दिला जातो. यात कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांचा समावेश आहे. वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत.
पद्म पुरस्कार सर्व क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या नागरिकांना दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com