पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर

Padma Shri Daya Pawar Memorial Award announced पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Padma Shri Daya Pawar Memorial Award announced

पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर

मुंबई: साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी निर्माते-दिग्दर्शक नितीन वैद्य, अभिनेत्री छाया कदम, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल साबळे आणि वैद्यकीय पत्रकार संतोष आंधळे यांची निवड झाली आहे.’ या सह भुरा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी जेएनयूचे प्रा. शरद बाविस्कर यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार जाहीर झाला आहे. Padma Shri Daya Pawar Memorial Award announced पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

हा पुरस्कार दया पवार प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी देण्यात येतो. या पुरस्काराचं वितरण  मुंबईत  विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या २० सप्टेंबरला एका विशेष कार्यक्रमात करण्यात येईल.

 यंदाचा हा चोविसावा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे.

यासंबंधी अधिक माहिती देताना दया पवार प्रतिष्ठानचे सचिव प्रशांत पवार यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाले नव्हते त्यामुळे यावर्षी सलग तीन वर्षांचे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. दया पवार यांच्या ‘बलुतं’ या गाजलेल्या आत्मकथनाला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २०१८ पासून नावाजलेल्या आत्मकथनांना ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार देण्यात येतो.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *