Paid e-pass facility for Darshan at Ambabai Temple, Kolhapur
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी सशुल्क ई-पास सुविधा
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच सशुल्क ई पास चा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून ‘सशुल्क ई-पास’ सुविधेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
तुळजापूरच्या धर्तीवर आधारित या प्रणालीचा उपयोग परगावच्या भाविकांना होणार आहे. यासाठी गेल्यावर्षीप्रमाणे इच्छुक भाविकांना ऑनलाईन बुकिंग करून हा पास मिळवता येणार आहे. त्या पासवर वेळ, तारीख दिली जाणार असून या, नोंदणी केलेल्यांची वेगळी रांग करण्यात येणार आहे.
याचा नेहमीच्या मोफत दर्शन रांगेवर कोणताही परिणाम होणार नाही, असं देवस्थान समितीनं स्पष्ट केलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com