Pakistan’s National Assembly approves a no-confidence motion against Imran Khan
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत इम्रान खान यांच्याविरुद्धचा अविश्र्वास प्रस्ताव मंजूर
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत इम्रान खान यांच्याविरुद्धचा अविश्र्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानं त्यांचं सरकार कोसळलं आहे. ३४२ सदस्यांच्या पाकिस्तानच्या संसदेत या अविश्र्वास प्रस्तावाच्या बाजूनं म्हणजेच इम्रान खान यांच्या विरोधात १७४ मतं पडली.
सत्तारुढ तहरीक ए इन्साफ पक्षाच्या सदस्यांनी या मतदानात भाग घेतला नाही. पीएमएल –एन या पक्षाचे अयाझ सादिक यांच्या अध्यक्षतेखाली या अविश्र्वास प्रस्तावावर मतदान पार पडलं. त्यानंतर त्यांनी हा अविश्वार ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली.
त्यानंतर त्यांनी विरोधकांच्या संयुक्त आघाडीचे पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार, पीएमएल – एनचे अध्यक्ष शहबाझ शरीफ यांच्याकडे सभागृहाची सूत्र सोपवली.
तत्पूर्वी काल रात्री या ठरावावर मतदान सुरू होण्याच्या काही मिनिटं आधी नॅशनल असेंब्लीचे सभापती असद कैसर आणि उपसभापती कासिम सुरी राजीनामा दिला.
Hadapsar News Bureau.