Special Course of Department of Pali and Buddhist Studies
पाली व बुद्धिस्ट अध्ययन विभागाचा विशेष अभ्यासक्रम
भाषातज्ज्ञ प्रा.गणेश देवी करणार मार्गदर्शन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बुद्धिस्ट अध्यायन या विभागातर्फे ‘ मेमरी कल्चर अँड द बीईंग ऑफ इंडिया’ हा विशेष अभ्यासक्रम आयोजित करण्यात येत आहे.
खेंसे फाऊंडेशन, इंडिया च्या मदतीने हा अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे. खेंसे फाऊंडेशन इंडिया, अभ्यागत प्राध्यापक म्हणून ख्यातनाम भाषातज्ज्ञ, पद्मश्री प्रा.गणेश देवी यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. ६ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत हा अभ्यासक्रम दर शनिवारी संध्याकाळी चार ते सहा या वेळेत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने हा अभ्यासक्रम चालणार आहे. याव्यतिरिक्त दर शुक्रवारी जिज्ञासूंना प्रा. गणेश देवी मार्गदर्शनासाठी विभागात उपलब्ध राहतील.
गुगल लिंक च्या माध्यमातून या अभ्यासक्रमाला अर्ज करावा असे पाली व बुद्धिस्ट अध्ययन विभागाचे प्रमुख प्रा. महेश देवकर यांनी सांगितले. याबाबतची अधिक माहिती पाली व बुद्धिस्ट अध्ययन विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आली असल्याचेही डॉ.देवकर यांनी सांगितले.
अभ्यासक्रमाला अर्ज करण्यासाठी Google link
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com