आगामी काळात भारतात बनलेल्या प्रवासी विमानाद्वारे देशातली लहान-मोठी शहरं जोडली जातील

Prime Minister Narendra Modi हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News.

Small and big cities of the country will be connected by passenger aircraft made in India in the future

आगामी काळात भारतात बनलेल्या प्रवासी विमानाद्वारे देशातली लहान-मोठी शहरं जोडली जातील, असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास

कर्नाटकातील शिवमोग्गा येथे 3,600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे  उद्घाटन आणि पायाभरणी

Prime Minister Narendra Modi हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News.
File Photo

शिवमोगा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक मधील शिवमोग्गा येथे 3,600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. तसेच शिवमोग्गा विमानतळाचे उद्घाटनही त्यांनी केले आणि तिथल्या सुविधांची पाहणी केली.

कर्नाटकच्या विकासाची वाटचाल सुरू असल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्रगतीचा हा मार्ग रोडवेज, एअरवेज आणि आयवेज (डिजिटल कनेक्टिव्हिटी) मधील प्रगतीमुळे प्रशस्त झाला आहे असे पंतप्रधान म्हणाले.

कर्नाटकचे दुहेरी इंजिन सरकार कर्नाटकच्या प्रगतीचे सारथ्य करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. पूर्वीच्या काळातील केवळ मोठ्या शहराभोवती केंद्रित विकासाच्या तुलनेत कर्नाटकातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांचाही मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे असे त्यांनी अधोरेखित केले. “शिवमोग्गाचा विकास या विचार प्रक्रियेचा परिणाम आहे”, असे ते म्हणाले.

आगामी काळात भारतात बनलेली प्रवासी विमानं आकाशात उड्डाण घेतील आणि देशाच्या लहान आणि मोठ्या शहरांना एकमेकांशी जोडतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

कर्नाटकमध्ये शिवमोगा इथल्या विमानतळाचं आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. २०१४ पूर्वी देशात केवळ ७४ विमानतळं होती, यामध्ये ७४ नव्या विमानतळांची भर पडली असून उडान कार्यक्रमा अंतर्गत आता सर्वसामान्यांसाठी विमान प्रवास शक्य झाल्याचं ते यावेळी म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक इथं ६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली.

कर्नाटकाच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुमारे ४५० कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या शिवमोग्गा विमानतळाचे उद्घाटन झालं असून, शिवमोग्गा-शिकारीपुरा-राणेबेन्नूर नवीन रेल्वे मार्ग आणि कोटेगांगरु रेल्वे कोचिंग डेपोसह दोन रेल्वे प्रकल्पांसाठीची पायाभरणी त्यांनी केली.

२१५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणीही, जल जीवन मिशन अंतर्गत, ९५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बहुग्राम योजनांची पायाभरणी सुद्धा त्यांनी केली. त्यांनी यावेळी इतर प्रकल्पांसह ८९५ कोटी रुपयांच्या ४४ स्मार्ट सिटी प्रकल्पांचं उद्घाटन केलं.

Hadapsar News
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *