सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आयोजित निवृत्तीवेतन अदालत संपन्न

Pensioners court held for retired employees

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आयोजित निवृत्तीवेतन अदालत संपन्न

पुणे : महाराष्ट्र शासनातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनासंदर्भात आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोषागार कार्यालयामार्फत बै.जी. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससुन सर्वोपचार रुग्णालयातील सभागृहात २ जून रोजी निवृत्तीवेतन (पेन्शन) अदालत संपन्न झाली.

या कार्यक्रमास प्रधान महालेखाकार कार्यालय उपमहालेखापाल (निवृत्तीवेतन) जिश्नू राजू, जिल्हा वरिष्ठ कोषागार अधिकारी शेखर शेटे उपस्थित होते. त्यांनी निवृत्तीवेतनाच्या संदर्भात येत असलेल्या विविध समस्यांच्या निराकरणाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

या अदालतीमध्ये जिल्ह्यातील निवृत्तीवेतन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह २५० निवृत्तीवेतनधारक सहभागी झाले होते. निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्याशी संबंधित उद्भवणाऱ्या समस्यांच्या अनुषंगाने तोंडी व लेखी स्वरुपात निवेदन देण्यात आले. लेखी समस्यांचे महालेखापाल व जिल्हा कोषागार कार्यालय विषयानुसार वर्गीकरण करुन लवकरात लवकर सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे कोषागार कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

यावेळी प्रधान महालेखाकर (लेखा व हक्कदारी) महाराष्ट्र १ (मुंबई) कार्यालयातर्फे निवृत्तीवेतन धारकांच्या सोयीकरीता असणाऱ्या साप्ताहिक ऑनलाईन निवृत्तीवेतन संवाद, २४ तास उपलब्ध टोल फ्री क्रमांक १८००-२२-००१४ व्हाईस मेल क्रमांक ०२०-७११७७७७५, माहिती वाहिनी, निवृत्तीवेतन सेवापत्र आणि भविष्यनिर्वाह निधी सेवापत्र निवृत्तीवेतन धारकांकरीता समर्पित ई-मेल helpdesk.mh1.ae@cag.gov.in या उपक्रमांची माहिती देण्यात आली.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *