लोक केंद्रीत शासन आणि सुशासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न हे सरकारच्या ८ वर्षांच्या कार्यकाळाचं वैशिष्ट्य

पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती. निर्मला सीतारामन Prime Minister, Shri Narendra Modi and Union Minister for Finance & Corporate Affairs Smt. Nirmala Sitharaman हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

People-centred government and continuous efforts for good governance are the hallmarks of the 8-year tenure of the government – Prime Minister

लोक केंद्रीत शासन आणि सुशासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न हे सरकारच्या ८ वर्षांच्या कार्यकाळाचं वैशिष्ट्य – प्रधानमंत्री

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आयकॉनिक सप्ताह समारंभाचे उद्‌घाटन केले. हा सप्ताह 6 ते 11 जून 2022 या कालावधीत ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ (एकेएएम) चा एक भाग म्हणून साजरा केला जात आहे.यावेळी केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह , पंकज चौधरी, डॉ भागवत कराड उपस्थित होते.पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वित्त आणि  कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती. निर्मला सीतारामन Prime Minister, Shri Narendra Modi and Union Minister for Finance & Corporate Affairs Smt. Nirmala Sitharaman हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News

लोक केंद्रीत शासन आणि सुशासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न हे आपल्या सरकारच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळाचं वैशिष्ट्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांनी ‘पतसंलग्न सरकारी योजनांसाठी, जनसमर्थ पोर्टल’हे राष्ट्रीय पोर्टल देखील सुरू केले. तसेच दोन्ही मंत्रालयांच्या गेल्या आठ वर्षांतील प्रवासाचा मागोवा घेणाऱ्या डिजिटल प्रदर्शनाचेही त्यांनी उद्‌घाटन केले. पंतप्रधानांनी यावेळी ₹ 1, ₹ 2, ₹ 5, ₹ 10 आणि ₹ 20 च्या नाण्यांची विशेष मालिकाही जारी केली. नाण्यांच्या या विशेष मालिकेमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवच्या बोधचिन्हाची संकल्पना आहे आणि दृष्टिहीन व्यक्तींना ती सहज ओळखता येतील.

गेल्या आठ वर्षांत भारतानं दर दिवशी एक नवं पाऊल उचललं असून नवीन काम करण्याचा प्रयत्न केल्याचं ते यावेळी म्हणाले. देशाचा विकास आणि गरिबांचं सबलीकरण याला सरकारने गती दिली असून स्वच्छ भारत अभियानानं गरिबांना प्रतिष्ठेचं आयुष्य जगण्याची संधी दिली असं ते म्हणाले.

पक्की घरं, वीज, गॅस, पाणी मोफत वैद्यकीयउपचार यामुळे गरिबांना योग्य सन्मान मिळाला तसंच पूर्वीच्या सरकार केंद्रीय प्रशासनाला मागे टाकत देशानं लोक-केंद्रित प्रशासनाकडे वाटचाल केल्याचं ते म्हणाले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याचा अर्थ केवळ स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरी करणं हा नसून स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिलेलं स्वतंत्र भारताचं स्वप्न पूर्ण करून नव्या जोमानं ते साजरं करण्याचा आहे असं ते म्हणाले. या समारंभात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित नवी नाणी प्रकाशित करण्यात आली.

जन समर्थ पोर्टल विषयी

13 सरकारी योजनांचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने अर्ज सादर करण्यासाठी आणि 125+वित्तीय संस्था ( एमएलाय ) (सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह) निवडण्यासाठी” जन समर्थ” पोर्टल एक खिडकी सुविधा प्रदान करते. सीबीडीटी,जीएसटी, उद्यम (युडीवायएएम), एनईनसेल, युआयडीएआय, सीआयबीआयएल इत्यादींसोबत प्रत्यक्ष त्या त्या वेळी पडताळणी झाल्यामुळें कर्जाची जलद प्रक्रिया सुनिश्चित होते.”जन समर्थ” पोर्टल कृषी, उपजीविका आणि शिक्षण या श्रेणीतील सरकारी योजनांअंतर्गत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देईल. जन समर्थ पोर्टलवर 13 सरकारी योजना आधीपासूनच आहेत आणि आणखी योजना समाविष्ट केल्या जातील. जन समर्थ” पोर्टल पात्रता तपासेल, तत्वतः मंजुरी देईल आणि निवडलेल्या बँकेकडे अर्ज पाठवेल.हे पोर्टल प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर लाभार्थ्यांना अद्यतनित ठेवेल.बँकेच्या शाखांना अनेकदा भेट देण्याची गरज राहणार नाही.
हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *