नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयातून वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी

Permission for Nawab Malik to seek medical treatment from a private hospital

नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयातून वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी

State Minorities Minister Nawab Malik हडपसर मराठी बातम्या Hadapsar News
File Photo

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयातून वैद्यकीय उपचार घेण्याची  परवानगी विशेष पीएमएलए न्यायालयानं आज दिली.

मलिक यांच्यावर काही दिवसांपासून सरकारी जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मलिक यांना चांगल्या उपचार सुविधांसाठी खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी देण्याची विनंती मलिक यांच्या वकिलानं  केल्यानंतर ही परवानगी देण्यात आली.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीनं या विनंतीला आक्षेप न घेतल्यामुळे न्यायालयानं ही परवानगी दिली.

दरम्यान मनी लाँडरिंग प्रकरणी अटकेत असलेले माजी मंत्री अनिल देशमुख यांना खाजगी रुग्णालयातून वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी विशेष पीएमएलए न्यायालयानं आज नाकारली.

राज्य सरकारचं जे जे रुग्णालय सर्व सुविधांनी आणि तज्ञ डॉक्टरांनी सुसज्ज आहे, त्यामुळे देशमुख यांना खाजगी रुग्णालयातून उपचार घ्यायला न्यायालयानं परवानगी देऊ नये, असा युक्तीवाद ईडीतर्फे करण्यात आला. तो न्यायालयानं ग्राह्य धरला.
हडपसर न्युज ब्युरो
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *