ई-कॉमर्स संकेतस्थळांवरच्या खोट्या प्रतिक्रियांवर (रिव्ह्यू) अंकुश ठेवण्यासाठी आराखडा विकसित करणार

Develop a plan to curb counterfeit text about goods and products on e-commerce websites

ई-कॉमर्स संकेतस्थळांवरच्या वस्तू आणि उत्पादनांविषयी लिहिलेल्या बनावट मजकूरांवर अंकुश ठेवण्यासाठी आराखडा विकसित करणार

नवी दिल्ली : ई-कॉमर्स संकेतस्थळांवरील खोट्या प्रतिक्रियांना (रिव्ह्यू) आळा घालण्यासाठी केंद्र सरकार एक यंत्रणा विकसित करणार आहे. भारतातील ई-कॉमर्स संस्थांद्वारे अवलंब केला जात असलेल्या सध्याच्या व्यवस्थेचा  आणि जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करून ग्राहक व्यवहार विभाग अशी व्यवस्था विकसित करेल.Develop a plan to curb counterfeit text about goods and products on e-commerce websites ई-कॉमर्स संकेतस्थळांवरच्या वस्तू आणि उत्पादनांविषयी लिहिलेल्या बनावट मजकूरांवर अंकुश ठेवण्यासाठी आराखडा विकसित करणार हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News

यासंदर्भातली सध्याची यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली सर्वोत्तम पद्धत यांचा अभ्यास केल्यानंतर ग्राहक व्यवहार विभाग हा आराखडा तयार करणार आहे. या वेबसाइट्सवर विक्रीसाठी असलेल्या वस्तूंविषयी ऑनलाइन स्वरूपात असत्य आणि भ्रामक आढावा सादर केल्यानं ग्राहक कशा प्रकारे प्रभावित होतात या मुद्द्यावर विभागानं सर्व संबंधितांशी नुकतीच चर्चा केली.

ई-कॉमर्समध्ये उत्पादन वस्तू प्रत्यक्ष पाहण्याची किंवा तपासण्याची कोणतीही सोय नसून केवळ आभासी खरेदी असल्यामुळे ज्या वापरकर्त्यांनी यापूर्वी या वस्तू किंवा सेवा खरेदी केल्या आहेत, त्यांची मते आणि अनुभव पाहण्यासाठी ग्राहक ई-कॉमर्स मंचावर नोंदवण्यात आलेल्या प्रतिक्रियांवर (रिव्ह्यू) मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात.

या समस्येवर बारकाईने देखरेख ठेवणे  आणि ग्राहक हिताच्या संरक्षणासाठी  बनावट प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य यंत्रणा विकसित करण्यावर सर्व संबंधितांनी सहमती दर्शवली.

ई-कॉमर्स कंपन्यांच्या हितधारकांनी  त्यांच्याकडे अशी यंत्रणा आहे, ज्याद्वारे बनावट प्रतिक्रियांवर देखरेख  ठेवली जाते असा दावा केला आणि या समस्येवर कायदेशीर चौकट विकसित करण्यात सहभागी व्हायला आवडेल असं म्हटले आहे.

ई-कॉमर्स ऑनलाईन खरेदीमध्ये ग्राहकांना वस्तू विकत घेण्यापूर्वी प्रत्यक्ष हाताळता येत नाही, त्यामुळे ते बरेचदा अशा उत्पादनांच्या समीक्षेवर आणि ते उत्पादन वापरलेल्या ग्राहकांच्या मतावर अधिक विश्वास ठेवतात.

ग्राहकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं, या समीक्षकांची सत्यता पडताळणं आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची यासंदर्भातली जबाबदारी या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, असं ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी सांगितलं.

संबंधित वेबसाईट वर अशा प्रकारचा आढावा प्रसिद्ध करण्यासाठी कोणते निकष लावले जातात ते शोधणं देखील आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *