Plantation of trees in Sadhana Vidyalaya.
साधना विद्यालय व भारत फोर्ज यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण
हडपसर : रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय व आर.आर. शिंदे ज्यु. कॉलेज, हडपसर येथे आज वृक्षारोपण करण्यात आले. साधना विद्यालय व भारत फोर्ज लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यालयामध्ये वृक्षारोपणासाठी भारत फोर्ज कंपनीतर्फे २६ प्रकारची ८२ झाडे व ५० ट्री गार्ड देण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, भारत फोर्ज कंपनीचे उपाध्यक्ष अरुल अरासू क भारत फोर्ज कंपनीच्या A.V.PHR & CSR Head डॉ. लीना देशपांडे ,पर्यवेक्षक दिलीप क्षिरसागर, शिवाजी मोहित, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद लालासाहेब खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमास विज्ञान विभाग प्रमुख धनाजी सावंत, हरित सेनेचे प्रमुख शैलेश बोरुडे, साधना खोत, वैशाली भोसले, नितेश मुजुमले, सविता माने, रेश्मा बोडके ,संगीता शिंगाणा उपस्थित होते.
पृथ्वीवरील वृक्षांचे प्रमाण कमी होत चालले आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे, झाडांची निगा राखणे आवश्यक आहे. एक झाड किमान ६० वर्षे सावली देते. वनांची संख्या फक्त 23% आहे, परंतु पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनांची संख्या 33% पाहिजे.
त्यामुळे वनांच्या संख्येत आणखी किमान १०% वाढ होणे गरजेचे आहे. तसेच वातावरणामध्ये कार्बनडाय ऑक्साईड वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण सतत वाढत आहे. प्रत्येकाने झाडांशी मैत्री करून वृक्षारोपण केले पाहिजे,” असे मत साधना विद्यालय व आर आर· शिंदे ज्यु· कॉलेजचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्डाचे सचिव दत्तात्रय जाधव यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख शैलेश बोरुडे यांनी केले. गोसावी श्रेयश व मारूकुमार सुमित्रा या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल वाव्हळ व प्रतापराव गायकवाड यांनी केले. साधना खोत यांनी आभार मानले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com