जादुई पिटारा ’ – 3 ते 8 वयोगटातील मुलांसाठी खेळावर आधारित शिक्षण-शैक्षणिक साहित्य

Union Education Minister and Skill Development Minister Shri Dharmendra Pradhan हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Jadui Pitara’ – Play-based learning-educational material for children aged 3 to 8 years

जादुई पिटारा ’ – 3 ते 8 वयोगटातील मुलांसाठी खेळावर आधारित शिक्षण-शैक्षणिक साहित्य

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत समाविष्ट पायाभूत टप्प्यासाठी शिक्षण-शैक्षणिक साहित्याचे अनावरण

जादुई पिटारा या उपक्रमाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत

Union Education Minister Dharmendra Pradhan Hadapsar News, Hadapsar Latest News

नवी दिल्‍ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते काल नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत समाविष्ट केलेल्या पायाभूत टप्प्यासाठी शिक्षण-शैक्षणिक साहित्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावरील राष्ट्रीय सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. के कस्तुरीरंगन उपस्थित होते.

आजचा दिवस शैक्षणिक क्षेत्राला अधिक चैतन्यशील बनवणारा ऐतिहासिक दिवस आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 3 ते 8 वयोगटातील मुलांसाठी तयार केलेले खेळावर आधारित शिक्षण-शैक्षणिक साहित्य ‘जादुई पिटारा’ चे अनावरण करण्यात आले आहे, असे धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले.

‘जादुई पिटारा’ मध्ये प्लेबुक, खेळणी, कोडी, पोस्टर्स, फ्लॅश कार्ड्स, गोष्टींची पुस्तके, वर्कशीट यांचा समावेश आहे, त्याचप्रमाणे स्थानिक संस्कृती, सामाजिक संदर्भ आणि भाषा यांचे प्रतिबिंब असून लहान मुलांची जिज्ञासा जागृत करण्यासाठी आणि मूलभूत टप्प्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण होतील अशाप्रकारे त्याची रचना केली आहे.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याअंतर्गत विकसित केलेला ‘जादुई पिटारा’ 13 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली. शिक्षण आणि शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध करण्यासह राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये अंतर्भूत केल्यानुसार भावी अमृत पिढीसाठी अधिक बाल-केंद्रित, चैतन्यशील आणि आनंददायी वातावरण निर्मितीसाठी ही एक मोठी झेप आहे, असे प्रधान यांनी सांगितले.

राष्ट्रीय थिंक टँक या नात्याने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, एनसीईआरटीने ‘जादुई पिटारा’ मधील साहित्य सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आणि शिशु अवस्थेत घ्यावयाची काळजी आणि विद्यमान शैक्षणिक परिस्थिती याबाबतचे आपल्या देशातील चित्र बदलण्यासाठी सर्व राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदांना हे साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

साहित्य DIKSHA प्लॅटफॉर्म – पोर्टल आणि मोबाइल अॅपवर डिजिटली उपलब्ध करून द्यावे. तसेच सर्व मूलभूत शिक्षण साहित्य मातृभाषेत असावे, असेही मंत्री म्हणाले.

जादुई पिटारा या उपक्रमाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत

जादुई पिटारा या मुलांना खेळातून शिक्षणाचा आनंद देणाऱ्या उपक्रमाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांच्या मनांत नवा उत्साह आणि नवे रंग भरले जातील, अशा शब्दात त्यांनी जादुई पिटारा या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या ट्विटवर मोदी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.


हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *