PM dedicates to nation main tunnel & five underpasses of Pragati Maidan Integrated Transit Corridor Project in New Delhi
पंतप्रधानांनी केला प्रगती मैदान एकात्मिक संक्रमण मार्गिका प्रकल्प राष्ट्राला समर्पित
प्रगती मैदान पुनर्विकास प्रकल्पाचा अविभाज्य भाग म्हणून मुख्य बोगदा आणि पाच भुयारी मार्गांचे समर्पण
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे प्रगती मैदान एकात्मिक ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाचा मुख्य बोगदा आणि पाच अंडरपास राष्ट्राला समर्पित केले. हा प्रकल्प 920 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आला आहे, जो संपूर्णपणे केंद्र सरकारच्या निधीतून आहे. प्रगती मैदानावर विकसित होत असलेल्या नवीन जागतिक दर्जाच्या प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्रामध्ये त्रासमुक्त आणि सहज प्रवेश प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, हा बोगदा प्रगती मैदानाचा २१व्या शतकातील गरजांनुसार कायापालट करण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे. त्यांनी या प्रकल्पाला केंद्र सरकारची दिल्लीतील जनतेसाठी मोठी भेट असल्याचे म्हटले. वाहतूक कोंडी आणि साथीच्या आजारामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यात किती मोठे आव्हान होते, याची आठवण मोदींनी केली. प्रकल्प पूर्ण करण्याचे श्रेय त्यांनी न्यू इंडियाच्या नवीन कार्यसंस्कृतीला आणि कामगार आणि अभियंत्यांना दिले.
पंतप्रधान म्हणाले की, दिल्ली जगातील सर्वोत्तम कनेक्टेड राजधानींपैकी एक म्हणून उदयास येत आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग, दिल्ली-डेहराडून द्रुतगती मार्ग, दिल्ली-अमृतसर द्रुतगती मार्ग, दिल्ली-चंदीगढ द्रुतगती मार्ग आणि दिल्ली-जयपूर द्रुतगती मार्ग दिल्लीला जगातील सर्वोत्तम कनेक्टेड राजधानी बनवत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. मोदी म्हणाले, गेल्या आठ वर्षांत दिल्ली-एनसीआरच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने अभूतपूर्व पावले उचलली आहेत. दिल्ली-एनसीआरमधील मेट्रो सेवा १९३ किमीवरून ४०० किमीपर्यंत विस्तारली आहे. मोदींनी लोकांना मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक वापरण्याची सवय लावायला सांगितले.
पंतप्रधान गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या व्हिजनद्वारे देश मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी निर्माण करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले, पंतप्रधान गतिशक्ती हे सबका विश्वास आणि सबका प्रयत्नांचे माध्यम आहे. पहिल्यांदाच सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरी नियोजनाला महत्त्व देत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. शहरी गरिबांपासून ते शहरी मध्यमवर्गापर्यंत सर्वांना चांगल्या सुविधा देण्यासाठी काम केले जात असल्याचे श्री मोदी म्हणाले. ते म्हणाले, गेल्या आठ वर्षांत एक कोटी ७० लाखांहून अधिक शहरी गरिबांना पक्की घरे देण्यात आली आहेत. लाखो मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्या घरांच्या बांधकामासाठीही मदत देण्यात आली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com