शिक्षण व्यवस्थेला २१ व्या शतकाच्या व्यापक विचारांशी सुसंगत करणं हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं उद्दिष्ट

Prime Minister Narendra Modi हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News.

PM inaugurates Akhil Bhartiya Shiksha Samagam on implementation of NEP

शिक्षण व्यवस्थेला २१ व्या शतकाच्या व्यापक विचारांशी सुसंगत करणं हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं उद्दिष्ट – प्रधानमंत्री

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीवर आधारित अखिल भारतीय शिक्षण समागमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर आधारित अखिल भारतीय शिक्षा समागमाचे उद्घाटन केले.

Prime Minister Narendra Modi हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News.
File Photo

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, अन्नपूर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह हे राज्यमंत्री , शिक्षणतज्ज्ञ आणि इतर हितसंबंधीत यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं उद्दिष्ट शिक्षण व्यवस्थेला संकुचित विचारातून बाहेर काढून २१व्या शतकाच्या व्यापक विचारांशी सुसंगत करण्याचं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात वाराणसीत होत असलेल्या शिक्षण बैठकीत ते बोलत होते. केवळ पदवीधारक युवक निर्माण करण्यापेक्षा देशाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण मनुष्यबळ निर्माण करून राष्ट्रासाठी योगदान देण्याच्या दृष्टीनं शैक्षणिक धोरण आवश्यक आहे असंही ते म्हणाले.

संकुचित विचारसरणीतून शिक्षणाला बाहेर काढून 21 व्या शतकातील आधुनिक विचारांशी शिक्षणाला जोडणे हा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मूळ आधार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

देशात बुद्धिमत्तेची आणि प्रतिभेची कधीच कमतरता नव्हती,मात्र , ब्रिटिशांनी निर्माण केलेली शिक्षणपद्धती कधीही भारतीय मूल्यांचा भाग नव्हती, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी भारतीय शिक्षणातील बहुआयामी मूल्य अधोरेखित केली आणि आधुनिक भारतीय शिक्षण पद्धतीसंदर्भात दृष्टीकोन विचारला.

“आपण केवळ पदवीधारक युवा वर्ग तयार करू नये तर देशाला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची गरज असलेली आपली शिक्षण व्यवस्था देशाला दिली पाहिजे, आपल्या शिक्षकांनी आणि शैक्षणिक संस्थांनी या संकल्पाचे नेतृत्व करावे, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

नव्या भारताच्या निर्मितीसाठी, नवीन प्रणाली आणि आधुनिक प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत यावरही पंतप्रधानांनी भर दिला.यापूर्वी ज्याची कल्पनाही केली जात नव्हती ते आता प्रत्यक्षात आले आहे, असे ते म्हणाले.“ कोरोनाच्या मोठ्या महामारीतून आपण केवळ इतक्या वेगाने सावरलो नाही, तर आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक झाली आहे. आज आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाचे स्टार्टअप व्यवस्था आहोत.” असे पंतप्रधानांनी सांगितले.

तीन दिवसीय शिक्षण समागमादरम्यान, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत उच्च शिक्षणासाठी निश्चित केलेल्या नऊ विषयांवर गट चर्चा आयोजित केल्या जातील. बहुविद्याशाखीय आणि समग्र शिक्षण; कौशल्य विकास आणि रोजगारक्षमता; संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकता; दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांची क्षमता बांधणी; गुणवत्ता,क्रमवारी आणि अधिस्वीकृती ; डिजिटल सक्षमीकरण आणि ऑनलाइन शिक्षण; न्याय्य आणि सर्वसमावेशक शिक्षण; भारतीय ज्ञान प्रणाली आणि उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण अशा विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

आज पासून सुरु झालेली ही परिषद तीन दिवस चालणार आहे

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *