Prime Minister inaugurates various development projects worth Rs 20,000 crore in Jammu and Kashmir tomorrow
प्रधानमंत्र्यांकडून उद्या जम्मू-काश्मीरमधे २० हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्धाटन
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाला भेट देऊन सकाळी साडेअकरा वाजता होणाऱ्या राष्ट्रीय पंचायत राज दिन सोहळ्यात सहभागी होत देशभरातल्या सर्व
ग्रामसभांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर ते संभा जिल्ह्यातल्या पल्ली पंचायतीला भेट देणार आहेत.
आपल्या दौऱ्यात मोदी सुमारे २० हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उदघाटन करणार आहेत. त्यांच्या हस्ते बनिहाल-काझीगुंड बोगद्याचं उद्घाटन होणार आहे. तीन हजार १०० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या पावणे नऊ किलोमीटर लांब बोगद्यामुळे बनिहाल आणि काझीगुंड मधलं अंतर सोळा किलोमीटरने कमी होऊन प्रवासाचा सुमारे दीड तास वाचणार आहे प्रधानमंत्री दिल्ली अमृतसर कटरा द्रुतगती महामार्गाची कोनशिलाही बसवणार आहेत.
सात हजार 500 कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग बांधण्यात आला आहे. प्रधानमंत्री मोदी अमृत सरोवर प्रकल्पही सुरुवात करणार आहेत. या प्रकल्पामुळे देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या ७५ जलप्रकल्पांचा विकास आणि पुनरुज्जीवन होणार आहे.
हडपसर न्युज ब्युरो