The Prime Minister is on a three-day visit to Gujarat from tomorrow
प्रधानमंत्री उद्यापासून तीन दिवसांच्या गुजरात भेटीवर
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या गुजरात भेटीवर जात आहेत.या दौऱ्यात ते उद्या सोमवारी गांधीनगरमध्ये शाळांच्या डेटा कमांड आणि सेंटर कंट्रोलला भेट देतील.
हे केंद्र वर्षाला पाचशे कोटीपेक्षा अधिक डेटा सेट संकलित करते. विद्यार्थ्यांतील अध्ययन निष्पत्ती वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विश्लेीषण या द्वारे त्यांच्यातील क्षमता वाढीसाठी हे महत्वाचे आहे.
त्यानंतर प्रधानमंत्री मंगळवारी बनासकांठा येथिल दियोदरमधील विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्याबरोबर त्यांची पायाभरणीही करतील. तसेच ते जामनगर येथिल जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषधि उपचार केंद्राचं भूमिपूजन करतील.
दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी ते गांधीनगर इथे जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोपक्रम परिषदेचं उद्घाटन करतील. या शिखर संमेलनातून गुंतवणूक वाढीसाठी मदत होण्याबरोबर नवोपक्रम, संशोधन आणि विकास, स्टार्ट अप तंत्र, आरोग्य क्षेत्र यांची वृद्धी व्हायला मदत होईल.
Hadapsar News Bureau