प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जामनगरमध्ये जागतिक पारंपारिक औषध केंद्राची पायाभरणी

Prime Minister lays foundation stone of World Traditional Medicine Center at Jamnagar

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जामनगरमध्ये जागतिक पारंपारिक औषध केंद्राची पायाभरणी

Prime Minister Narendra Modi  हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News.
File Photo

जामनगर: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या जामनगर इथं जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपारिक औषध केंद्राची पायाभरणी केली.

जागतिक पारंपारिक औषध केंद्र हे जगातले अशा प्रकारचे पहिलेच केंद्र असून या केंद्राच्या माध्यमातून जगभरातल्या पारंपारिक औषधांचे प्रमुख केंद्र असेल. यावेळी मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जगन्नाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयासेस उपस्थित होते.

यावेळी बांगला देशच्या प्रधानमंत्री शेख हसीना, भुतानचे प्रधानमंत्री लोटाय शेरिंग आणि नेपाळचे प्रधानमंत्री शेर बहादूर देओबा यांनी व्हिडियोच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा पाठवल्या.

या औषध केंद्राबद्दल जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले. हा खऱ्या अर्थानं एक जागतिक प्रकल्प असून जगातल्या अनेक देशांना इथल्या सेवा पुरवल्या जातील असंही ते म्हणाले.

यावेळी बोलतांना मॉरिशसच्या प्रधानमंत्र्यांनी या केंद्राच्या उभारणीला सुरुवात झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या जागतिक केंद्राला आवश्यक ती सर्व मदत केल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, केंद्रिय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

हडपसर न्युज ब्युरो (Hadapsar News Bureau)

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *