गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याची वाटचाल देशाला विकसित भारताकडे घेऊन जाईल- प्रधानमंत्री

Prime Minister inaugurated the 'Kartavya Path' and unveiled the statue of Netaji Subhash Chandra Bose at India Gate. पंतप्रधानांनी 'कर्तव्य पथ' चे उद्‌घाटन आणि इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे केले अनावरण हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

PM Modi calls upon every citizen to visit Kartavya Path, Statue of Netaji Subhash Chandra Bose at India Gate

गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याची वाटचाल देशाला विकसित भारताकडे घेऊन जाईल- प्रधानमंत्री

पंतप्रधानांनी ‘कर्तव्य पथ’ चे उद्‌घाटन आणि इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे केले अनावरण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला आवाहन केले असून नव्याने बांधण्यात आलेल्या कर्तव्य पथ आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला भेट देण्याचे खुले आमंत्रण दिले आहे.Prime Minister inaugurated the 'Kartavya Path' and unveiled the statue of Netaji Subhash Chandra Bose at India Gate. पंतप्रधानांनी 'कर्तव्य पथ' चे उद्‌घाटन आणि इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे केले अनावरण हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

देशाची विचार आणि व्यवहार गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याची वाटचाल सुरू आहे. ही मुक्ती देशाला विकसित भारताकडे घेऊन जाईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  केलं. नवी दिल्ली कर्तव्य पथाचं उद्घाटन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडिया गेटवरच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते. देशात गेल्या काही वर्षात गुलामगिरीची निशाणी असलेली प्रतिकं, चिन्हं बदलण्याचं काम जोमाने सुरू आहे.

इंग्रजाच्या काळापासून सुरू असलेले अनेक नियम-कायदे बदलण्यात आले आहेत, याकडे प्रधानमंत्र्यांनी यावेळी लक्ष वेधलं. अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळेत केलेला बदल, नवीन शैक्षणिक धोरण यासारख्या गोष्टींचाही त्यांनी उल्लेख केला. यावेळी त्यांनी नेताजींच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. मधल्या काळात नेताजींच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

यावेळी त्यांनी याठिकाणी काम करणाऱ्या मजुरांशीही संवाद साधला आणि त्यांना २६ जानेवारीच्या संचलनात विशेष पाहुणे म्हणून सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. पुढचे ३ दिवस कर्तव्य पथावर नेताजींच्या जीवनावर आधारित ड्रोनचं शोचं आयोजन केलं जाणार असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. यासाठी त्यांनी नागरिकांना याठिकाणाला भेट देण्याची विनंती केली.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन, DMRC आजपासून सेंट्रल व्हिस्टा किंवा इंडिया गेटला भेट देणाऱ्यांसाठी बस सेवा पुरवणार आहे.

इलेक्ट्रिक बसेस चार पिकअप पॉईंट्स-भैरॉन रोड, राज घाट, पालिका पार्किंगजवळील कॅनॉट प्लेस आणि जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथून अभ्यागतांना घेऊन जातील आणि नॅशनल स्टेडियम ‘सी’ हेक्सागनच्या गेट क्रमांक 1 वर सोडतील.

‘सी’ षटकोनीवरून इंडिया गेट किंवा सेंट्रल व्हिस्टा येथे पायी जाता येते.

डीएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज संध्याकाळी ५ पासून बससेवा उपलब्ध होईल. शेवटची पिक-अप रात्री ९ वाजता असेल. ही सुविधा सुरुवातीला आठवडाभर उपलब्ध राहणार असून या मार्गांवर एकूण 12 बसेस चालवण्यात येणार आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *