PM Modi, UK’s Boris Johnson speaks on Ukraine situation; Reiterates India’s appeal for cessation of hostilities
युक्रेन प्रश्नावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांच्यात विस्तृत चर्चा
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्याशी युक्रेनमधील परिस्थिती बाबत विस्तृत चर्चा केली. मोदी यांनी आपसांतील वैर संपवून, चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गाने प्रश्न सोडवले जावेत या भारताच्या आग्रहाचा पुनरुच्चार केला.
समकालीन विश्व व्यवस्थेच्या अनुषंगानं भारताचा आंतरराष्ट्रीय कायदा आणि प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रांचं सार्वभौमत्व यावर विश्वास असल्याच्या मुद्द्यावर मोदी यांनी भर दिला.
दरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय हिताच्या मुद्द्यांवरही चर्चा केली, यामध्ये व्यापार,तंत्रज्ञान,गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा तसंच नागरिकांमधील परस्पर संबंध आदी विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा मुद्द्याला दोन्ही देशांनी सहमती दिली.
मुक्त व्यापार कराराच्या संदर्भात चाललेल्या वाटाघाटींना दोन्ही देशांकडून सकारात्मक गती मिळत असल्याच्या मुद्द्यावर मोदी यांनी समाधान व्यक्त केलं. भारत – ब्रिटन प्रारूप 2030 राबवण्यासंदर्भातील प्रगतीचीही पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली. ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांनी नजीकच्या काळात भारत भेटीला यावे अशी आपली इच्छा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी या संभाषणादरम्यान नमूद केलं.
Hadapsar Latest News