PM Modi unveils National Emblem cast on the roof of New Parliament Building
संसदेच्या नव्या इमारतीवरच्या अशोक स्तंभाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या नव्या इमारतीवर लावण्यात आलेल्या अशोक स्तंभाचं अनावरण केलं. साडेसहा मीटर उंच असलेल्या आणि कास्य धातूपासून तयार केलेल्या या अशोक स्तंभाचं वजन साडे ९ हजार किलो आहे. यावेळी त्यांनी तिथं काम करणाऱ्या व्यक्तींसोबतची चर्चा केली.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे-“संसद भवनाच्या छतावर उभारलेल्या राष्ट्रीय मानचिन्हाचे आज सकाळी अनावरण करण्याचा सन्मान मिळाला.”
यावेळी पंतप्रधानांनी संसद भवनाच्या उभारणीसाठी कष्ट घेणाऱ्या श्रमिकांशीही संवाद साधला.
“हे संसद भवन बांधण्यासाठी कष्ट करणाऱ्या सर्व श्रमिकांशी माझा अत्यंत चांगला संवाद झाला. त्यांच्या सर्व प्रयत्नांचा आम्हाला अत्यंत अभिमान असून देशासाठी त्यांनी दिलेले योगदान आम्हाला कायम लक्षात राहील.”
हे राष्ट्रीय मानचिन्ह ब्रॉन्झपासून बनवले असून त्याचे एकूण वजन 9500 किलोग्राम आहे. तर उंची 6.5 मीटर इतकी आहे. या मानचिन्हाला आधार देणारी, 6500 किलोग्रामची पोलादाची रचना देखील त्याच्याभोवती बसवण्यात आली आहे. नव्या संसद भवनाच्या बरोबर मध्यावर हे मानचिन्ह बसवण्यात आले आहे.
या मानचिन्हाची संकल्पना रेखाटन आणि आणि त्यानंतर तसा आकार देऊन ते तयार करणे हे काम तसेच, मानचिन्हाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यापूर्वी आठ विविध स्तरांवर काम करण्यात आले होते. यात, क्ले मॉडेलिंग/कम्प्युटर ग्राफीकच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com