इंग्लंडचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन येत्या २१ एप्रिलला २ दिवसाच्या भारत भेटीवर

The Prime Minister of the United Kingdom Boris Johnson will pay a two-day visit to India on April 21

इंग्लंडचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन येत्या २१ एप्रिलला २ दिवसाच्या भारत भेटीवर

नवी दिल्ली : इंग्लंडचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन येत्या २१ एप्रिलला २ दिवसाच्या भारत भेटीवर येणार आहेत. प्रधानमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते प्रथमच भारत भेटीवर येत आहेत.PM Narendra Modi-UK PM Boris Johnson हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News, Hadapsar News

बोरिस जॉनसन दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन दोन्ही देशांच्या परस्पर हीतसंबंधांच्या मुद्द्यावर चर्चा करतील.

याबरोबरच ते गुजरातलाही भेट देतील. दोन्ही देशांमधले संबंध दृढ करण्यासाठी आखलेल्या ‘रोड मॅप २०३०’चा बोरिस जॉनसन आढावा घेतील तसंच जागतिक

आणि क्षेत्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाण घेवाण करतील.

ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले की, भारत ही एक मोठी आर्थिक शक्ती आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून या अनिश्चित काळात यूकेसाठी अत्यंत मौल्यवान

धोरणात्मक भागीदार आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले की, निरंकुश राज्यांकडून जागतिक शांतता आणि समृद्धीला येणारे धोके लक्षात घेता, लोकशाही आणि मित्रांनी एकत्र राहणे अत्यावश्यक आहे.

भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांदरम्यान प्रदीर्घ ऐतिहासिक संबंध असून २०२१ मध्ये झालेल्या शिखर परिषदेत ते आणखी दृढ झाले आहेत

Hadapsar News Bureau

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *