‘Prime Minister urges all Indians to work together to make the idea of a self-reliant India a reality
आत्मनिर्भर भारताचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा प्रधानमंत्र्यांचे आवाहन
नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारताचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये सुरत इथं सरदारधाम द्वारा आयोजित जागतिक पाटीदार व्यवसाय शिखर परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे झालं, त्यावेळी ते बोलत होते.
भारतात साधन-संपत्तीची कमतरता नाही, मात्र आपल्या संसाधनांचा उपयोग आत्मविश्वासानं करायला हवा, ज्यावेळी विकास प्रक्रियेत सर्व नागरिकांचं योगदान असतं तेव्हाच असा आत्मविश्वास प्राप्त होतो, असं ते म्हणाले.
देशातला सामान्य परिवारातला युवक देखील उद्योजक व्हावा, यादृष्टीनं केंद्र सरकार आपल्या योजना आणि कृतीद्वारे निरंतर प्रयत्न करत आहे, असं त्यांनी सांगितलं.
मुद्रा योजनेमुळे छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळत आहे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रामुळे रोजगार मिळत आहेत, स्टार्ट अप इंडिया योजनेमुळे अनेक होतकरु तरुणांना उद्योग क्षेत्र खुलं झालं आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो