नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी १२ वाजता देशातल्या कोविड परिस्थितीबाबत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधतील. काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविडची दैनंदिन
File Photo
रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सध्या देशात कोविड ऍक्टिव्ह रुग्णसंख्या १५ हजार ६३६ इतकी असून काल देशात कोविडच्या २ हजार ४८३ नव्या रुग्णांची नोंद झाली. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या मागील बैठकीत
संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कोविड बाबत सतर्क राहावं असे निर्देश प्रधानमंत्र्यांनी दिले होते.
तसंच केंद्रसरकारच्या अधिकाऱ्यांनी राज्यांशी समन्वय साधून सरकारी धोरणां अंतर्गत कोविडचा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करावं असे निर्देश दिले होते. प्रधानमंत्री मोदी यांनी यापूर्वी देखील राज्यांचे मुख्यमंत्री आणि
प्रशासकांबरोबरच्या बैठकीत जिल्हा स्तरावरच्या कोविड परिस्थितीचा आढावा घेतला होता.