Prime Minister Narendra Modi’s discussion with British Prime Minister Rishi Sunak
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्याशी चर्चा
मुक्त व्यापार कराराच्या लवकर निष्कर्षावर दोन नेते सहमत
नवी दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिटनचे नवनियुक्त प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्याशी संवाद साधला. ब्रिटनचे प्रधानमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल सुनक यांचं मोदी यांनी अभिनंदन केलं.
दोन्ही राष्ट्रांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी ते एकत्र काम करतील, असं आज एका ट्विटमध्ये मोदी यांनी म्हटलं आहे.
सर्वसमावेशक आणि संतुलित मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या महत्त्वावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
सुनक यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ब्रिटन आणि भारताचे खूप दृढ संबंध आहेत, असं एका ट्विटमध्ये सुनक म्हणाले.
दोन महान लोकशाही काय साध्य करू शकतील याबद्दल उत्सुकता आहे. दोन्ही राष्ट्रे पुढच्या काही महिन्यांत आणि वर्षांत सुरक्षा, संरक्षण आणि आर्थिक भागीदारी अधिक दृढ करतील, असं सुनक यांनी म्हटलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com