विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातर्फे ‘पॉडकास्ट निर्मिती कार्यशाळा’

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

‘Podcast Production Workshop’ by the Department of Communication and Journalism of the University

विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातर्फे ‘पॉडकास्ट निर्मिती कार्यशाळा’

पुणे : सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाकडून सहा दिवसांची ‘पॉडकास्ट निर्मिती कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना विभागाच्या प्रमुख डॉ.उज्ज्वला बर्वे म्हणाल्या, श्राव्य माध्यमाची लोकप्रियता वाढत चालली आहे, असं सगळीकडे वाचायला आणिSavitribai Phule Pune University अर्थातच ऐकायला मिळतं. त्याचं महत्त्वाचं कारण पॉडकास्ट हे माध्यम आहे. असंख्य विषयांवरचे उत्तमोत्तम पॉडकास्ट्स अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. ते मोठ्या प्रमाणावर ऐकले जातात. मराठीतही काही आहेत. पण आणखी पॉडकास्टना खूप संधी आहे. काहींना सुरू करायचे आहेत, पण ते कसं करायचं ते माहीत नाही. काहींना या माध्यमाचीच फारशी माहिती नाही. अशा सगळ्यांसाठी ही कार्यशाळा आहे.

यासाठी पात्रता किमान बारावी उत्तीर्ण असून १४, १५, १७, १९, २०, २१ सप्टेंबर हे सहा दिवस फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर रानडे इन्स्टिट्यूटमध्ये ही कार्यशाळा होईल. नचिकेत क्षिरे हे मराठी पॉडकास्टर सहभागींना मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेसाठी प्रथम शुल्क भरणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर जास्तीत जास्त वीस जणांना प्रवेश देण्यात येईल.

आणखी तपशील  https://events.unipune.ac.in/sites/Workshop_PK/  या लिंकवर मिळेल, व तिथेच नावही नोंदवता येईल. ऑक्टोबर महिन्यात सोशल मीडिया व डिजिटल मार्केटिंग याविषयीची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी ०२०-२५६५४०६९ अथवा ८४०८०५७८९२ या क्रमांकावर संपर्क करावा.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *