जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाच्या रिक्त पदासाठी १८ मे रोजी मतदान

State Election Commission. राज्य निवडणूक आयोग हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Polling for the vacant post of Gram Panchayat member and Sarpanch in the district on May 18

जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाच्या रिक्त पदासाठी १८ मे रोजी मतदानState Election Commission. राज्य निवडणूक आयोग हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पुणे : जिल्ह्यातील सुमारे १९५ ग्रामपंचायतीतील २८० सदस्य आणि १० थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार हे मतदान होत आहे.

नामनिर्देशनपत्र २५ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत दाखल करता येतील. २९ एप्रिल, ३० एप्रिल आणि १ मे या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.

नामनिर्देशनपत्रांची छाननी ३ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून होईल. नामनिर्देशनपत्रे ८ मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.

१८ मे २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १९ मे २०२३ रोजी होईल.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *