Population growth is a global problem – Principal Dattatraya Jadhav.
लोकसंख्या वाढ जागतिक समस्या – प्राचार्य दत्तात्रय जाधव.
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे लोकसंख्यावाढ व इशारा दिन कार्यक्रम
हडपसर: 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जाव्य अपत्य जन्माला आले. तेव्हापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या वाढ व इशारा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जगाची लोकसंख्या सध्या 8 अब्जाच्या वर गेली आहे.
2023 मध्ये भारताची लोकसंख्या 142 कोटी 86 लाखावर गेली आहे. लोकसंख्या वाढीचे फायदे व तोटेही असतात. त्यामुळे लोकसंख्या मर्यादित असणे गरजेचे आहे. गुणवत्तापूर्ण लोकसंख्या असणे हा देशाच्या विकासातील महत्त्वाचा घटक आहे. अन्यथा वाढती लोकसंख्या ही जागतिक समस्या होऊ शकते असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्ड सचिव प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे लोकसंख्यावाढ व इशारा दिन आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
विद्यालयातील उपशिक्षिका चित्रा हेंद्रे यांनी लोकसंख्या गीत सादर केले. त्यानंतर गंधर्व वाव्हळ या विद्यार्थ्यांने लोकसंख्यावाढ व इशारा दिन विषयी आपले मनोगत व्यक्त केले. अनिल वाव्हळ यांनी शिक्षक मनोगतात लोकसंख्यावाढ व इशारा दिन
साजरा करण्याचा व लोकसंख्यावाढ फायदे तोटे सांगितले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव , उपप्राचार्य डॉ. अमिरुद्दीन सिद्दीकी ,उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत,आजीव सेवक अनिल मेमाणे,सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश निचळे यानी केले.सूत्रसंचालन सविता पाषाणकर यांनी केले.तर आभार कोमल जायभाय यांनी मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com