Start of course for students of Post Graduate Medical Education and Research Institute of Arogya University
आरोग्य विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमास प्रारंभ
समाजाचे आरोग्य प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे संशोधन – मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन
नाशिक : आरोग्य शास्त्राच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी समाजाचे आरोग्य प्रश्न मूळापासून समजावून घेऊन त्यावर संशोधनाव्दारे उत्तरे शोधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत कार्यान्वीत असलेल्या महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचच्या अभ्यासक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे.
या प्रसंगी विद्यार्थ्यांचे नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे विद्यापीठातर्फे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास व्यासपीठावर मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर समवेत प्रमुख व्याख्यात्या एमिस्टस कन्सलन्टंट, नॅशनल युनिव्हर्सिटी, सिंगापूर येथील नेफ्रालॉजी विषयातील तज्ज्ञ प्रा. डॉ. याप हयु किम उपस्थित होत्या.
मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, आरोग्य विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला असल्याने तुमच्या वरील जबाबदारी अधिक महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात अभ्यासक्रमासमवेत विविध विषयांच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण आहे.
या अनुषंगाने विद्यापीठाचे रौप्य महोत्सवी वर्षात विद्यार्थी व शिक्षकांसाठी व्याख्यानांचे आयोजन आयोजन करण्यात येणार आहे. शिक्षण व संशोधनाचा उपयोग समाजातील नागरिकांना हाणे महत्वाचे आहे. पदव्युत्तर शिक्षणात संशोधनाला चालना गुणात्मक दर्जावाढीसाठी संवाद कौशल्य, व्यक्तीमत्व विकास आदींवर विद्यार्थ्यांनी प्रभावी काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मार्गदर्शन एमिस्टस कन्सलन्टंट, नॅशनल युनिव्हर्सिटी, सिंगापूर येथील नेफ्रालॉजी विषयातील तज्ज्ञ प्रा. डॉ. याप हयु किम यांनी सांगितले की, तुमचे संशोधनं केवळ अभ्यासक्रमाचा भाग न होता अधिक व्यापक उद्दिष्ट्य ठेवणारे असलं पाहिजे. तुमच्या संशोधनामुळे एका जरी रुग्णाला जीवदान मिळाले तर तो तुमच्या सगळ्या कष्टांचे फलित आहे असे समजावे असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी पेडिएट्रीक अँण्ड चाईल्ड नेफ्रॉलॉजी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेत विविध विषयातील नव्याने प्रवेशित 52 विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com