विधानसभा अध्यक्षपद गांभीर्याने आणि न्यायबुद्धीने सांभाळीन

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर याची निवड. Election of Rahul Narvekar as the Speaker of Maharashtra Assembly. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Post of Assembly Speaker will be taken seriously and with justice: Newly-elected Speaker Adv. Rahul Narvekar

विधानसभा अध्यक्षपद गांभीर्याने आणि न्यायबुद्धीने सांभाळीन : नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सभागृहाचे मानले आभार

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर याची निवड. Election of Rahul Narvekar as the Speaker of Maharashtra Assembly. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar Newsमुंबई : भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत वैशिष्ट्यपूर्ण स्थान असलेल्या ‘महाराष्ट्र विधानसभा’ या राज्यातील सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे आभार मानले.

आपणा सर्वांच्या सदिच्छांसह मी विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार नम्रपणे स्वीकारीत असून लोकशाहीतील हे महत्त्वाचे पद मी गांभीर्याने आणि न्यायबुद्धीने सांभाळीन, अशी ग्वाही श्री.नार्वेकर त्यांनी दिली.

राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात आज ॲड.राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. त्यानंतर ते बोलत होते.

ॲड.नार्वेकर म्हणाले, आपली संसदीय लोकशाही सर्व प्रकारच्या राजकीय विचारछटांना स्थान देते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. जनादेशाचा आदर राखणे आणि संसदीय सभ्याचार जपला जाणे आवश्यक आहे.

श्री.नार्वेकर म्हणाले, विधानसभेची ही पवित्र वास्तू राज्यातील 14 कोटी जनतेच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतीक आहे. आपणा सारख्या लोकप्रतिनिधींमार्फत या इच्छा-आकांक्षा विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सभागृहात मांडल्या जाणे आणि त्यानुसार निर्णयप्रक्रियेचे चक्र गतिमान राहणे आवश्यक आहे.

कायदे करणे हे कायदेमंडळाचे महत्वाचे कार्य आहे. विधेयकांवर दोन्ही बाजूने सांगोपांग चर्चा होऊन येणारा नवीन कायदा अधिकाधिक परिपूर्ण असावा अशी अपेक्षा असल्याचे सांगून यासंदर्भात येत्या काळात परिस्थिती निश्चितच सुधारलेली असेल, त्यादृष्टीने काही व्यवस्था आपण तयार करू, असे ॲड. नार्वेकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांचे आपल्याला मार्गदर्शन लाभेल, अशी भावना व्यक्त करून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात टिळक- गोखले- आंबेडकर- नाना पाटील- सावरकर यासारख्या महान देशभक्तांची भूमी असलेल्या महाराष्ट्राच्या या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी आपण माझी निवड केली हा मी माझ्या आजपर्यंतच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीतील सर्वोच्च बहुमान समजतो, असे ॲड.नार्वेकर यांनी सांगितले.

प्रारंभी भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी त्याग आणि बलिदान दिलेल्या सर्व आदरणीय नेत्यांना आणि शूरवीरांना तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, या सभागृहाचे आणि लोकसभेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब मावळणकर अशा सर्व महात्म्यांना नतमस्तक होत ॲड.नार्वेकर यांनी वंदन केले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *