Union Minister of State for Coal Mines alleges a power crisis in the state due to errors in planning
नियोजनातल्या त्रुटीमुळं राज्यात वीज संकट निर्माण झाल्याचा केंद्रीय कोळसा खाण राज्यमंत्र्यांचा आरोप
बुलढाणा: योग्य नियोजन नसल्यानं राज्यात वीज-संकट निर्माण झालं असून याला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका केंद्रीय रेल्वे तसंच कोळसा खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.
ते आज बुलढाणा इथं बातमीदारांशी बोलत होते. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरल्याचं ते यावेळी म्हणाले.
कोळसा खरेदीची परवानगी द्यायला आपण तयार असून बाहेरून कोळसा विकत घेऊन सरकारनं राज्याला वीजसंकटापासून वाचवावं असं आवाहन त्यांनी केलं.
राज्याकडे केंद्राचे ३ हजार कोटी रुपये थकीत असूनही केंद्रसरकार कोळसा द्यायला तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Hadapsar News Bureau.