नागपुर मधील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)च्या लाभार्थ्यांना घरकुलांचे वितरण

Distribution of houses to beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojana (Urban) in Nagpur by Nitin Gadkari नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुर मधील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)च्या लाभार्थ्यांना घरकुलांचे वितरण हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Distribution of houses to beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojana (Urban) in Nagpur by Nitin Gadkari

नागपुर मधील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)च्या लाभार्थ्यांना घरकुलांचे वितरण

केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)च्या लाभार्थ्यांना घरकुलांचे वितरणDistribution of houses to beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojana (Urban) in Nagpur by Nitin Gadkari नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुर मधील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)च्या लाभार्थ्यांना घरकुलांचे वितरण हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या लाभार्थ्यांना आज घरकुलांचे वितरण करण्यात आले. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) द्वारे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) घटक क्रमांक 3, घटक क्रमांक 4 च्या लाभार्थ्यांना केंद्र शासन आणि राज्य शासनाद्वारे ‘सर्वांसाठी घरे ‘ या अभियानास आठ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने गडकरी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाच्या चावीचे वितरण आज करण्यात आले.

याप्रसंगी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी उपस्थित होते. या आवास योजनेतील घरकुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेचा आढावा गडकरी यांनी उपस्थित अधिकार्‍यांकडून घेतला. प्रधानमंत्री आवास योजनेची चित्रफीतही यावेळी दाखवण्यात आली.

एनएमआरडीएतर्फे बांधण्यात येणाऱ्या घटक क्रमांक 3 , घटक क्रमांक 4 या योजनेमध्ये सुमारे 20,468 घरांचा समावेश असून या प्रकल्पामध्ये 333 कोटी प्राप्त झाले असून 7070 लाभार्थ्यांना 100 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे.  कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आलेल्या 7,829 लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये 1 लक्ष प्रमाणे 78.29 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे . असा एकूण 178.29 कोटी निधी वितरित करण्यात आला असून उर्वरित घरकुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे अशी माहिती एनएमआरडीए व्दारे देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना घटक क्रमांक चार या योजनेत हिंगणा, नागपूर ग्रामीण, कामठी, मौदा, पारशिवणी, उमरेड, कुही, सावनेर, कळमेश्वर या 9 तालुक्यातील एकूण 316 ग्रामपंचायतीचा समावेश आहे .

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *