‘सूचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धेचे आयोजन

Skill Development, Employment & Entrepreneurship Department

Organization of ‘Suggest your preferred skill course’ competition

‘सूचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धेचे आयोजन

पुणे : कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्याकरीता १५ नोव्हेंबर पर्यंत ‘सूचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून जास्तीत-जास्त प्रशिक्षणार्थ्यांनी तसेच शिकाऊ उमेदवारांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.Skill Development, Employment & Entrepreneurship Department

शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करताना प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग वाढविणे, त्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावा यादृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोणत्याही शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या किंवा उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. त्यासाठी वयाची अट नाही. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जाहिरातीतील क्यू. आर. कोड स्कॅन करुन किंवा https://forms.gle/iP1HaoR1goKgfX1NA या लिंकवर अर्ज भरणे आवश्यक आहे.

अभ्यासक्रम सुचविण्यासाठी प्राधान्याने व्यवसाय क्षेत्र, रोजगार क्षेत्र, महिला रोजगार क्षेत्र, तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम, अन्य उपयुक्त अभ्यासक्रम ही क्षेत्रे निश्चित करण्यात आलेली आहेत.

कौशल्य अभ्यासक्रम सुरु करण्याची सबळ कारणे सादरीकरणावेळी नमूद करावीत. प्राप्त प्रस्तावातून तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय प्रस्तावांची छाननी करुन सर्वोत्कृष्ट तीन स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे. त्यांना प्रथम क्रमांक रोख ५ हजार रुपये, द्वितीय ३ हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये अशी पारितोषके देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहा. प्रशिक्षणार्थी सल्लागार यशवंत कांबळे (९८२३७१२२४५) किंवा नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.
.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “‘सूचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धेचे आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *