Preparations to start 5G services in the country by October
ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण
नवी दिल्ली : येत्या ऑक्टोबरपर्यंत देशात फाईव्ह-जी सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण झाल्याचं दूरसंवाद मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं भारतीय टेलीग्राफ अधिकार नियम, २०१६ मध्ये सुधारणा जारी करताना बोलत होते.
देशात फाईव्ह-जी सेवा वेगानं आणि सुलभ रीतीनं लागू करण्यासाठी दूर संवादाबाबतच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं हा यामागचा उद्देश असल्याचं ते यावेळी म्हणाले.
एकात्मिक पद्धतीनं पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पने नुसार यंदाच्या मे महिन्यात गती शक्ती पोर्टल सुरु केल्याचं ते म्हणाले.
फाईव्ह-जी सेवा सुरु करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची माहिती तंत्रज्ञान प्रणाली आणि रेल्वे, महामार्ग यासारखी प्रमुख केंद्रीय मंत्रालयं या पोर्टलला जोडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
राईट ऑफ वे अर्थात दूरसंवाद टॉवर्स उभारणे , ऑप्टिकल फायबर्स केबल टाकणे इत्यादीसाठीच्या ढाच्यात सुधारणा केल्यामुळे दूरसंवाद पायाभूत सुविधा वेगाने आणि सुलभरित्या तैनात करणे शक्य होईल.
भारतात 5G चे जलद कार्यान्वयन व्हावे यासाठी, गतिशक्ती संचार पोर्टलवर नव्या 5G राईट ऑफ वे अर्जदेखील जारी करण्यात आले. डीसीसीचे अध्यक्ष आणि सचिव (दूरसंचार )के राजारामन, दूरसंचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात,अश्विनी वैष्णव यांनी देशभरात 5G सेवांचे जलद कार्यान्वयन सुनिश्चित करण्यासाठी 4 मूलभूत घटकांचा उल्लेख केला. यात प्रामुख्याने स्पेक्ट्रमचे वाटप, राईट ऑफ वे परवानगी प्रक्रियेत सुधारणा, सहकारी संघराज्य आणि सेवांची अंमलबजावणी यांचा उल्लेख केला. स्पेक्ट्रम वाटप यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. एकात्मिक पद्धतीने पायाभूत सुविधांच्या विकासाच्या माननीय पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने दूरसंवाद विभागाने मे 2022 मध्ये गतिशक्ती संचार पोर्टल सुरू केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com