Presentation of five remarkable inventions at Raj Bhavan in the University
पाच उल्लेखनीय आविष्कारांचे विद्यापीठातील राजभवनावर सादरीकरण
समजाभिमुख संशोधनाला मिळणार पाठबळ
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या पंधराव्या आंतर महाविद्यालयीन आविष्कार स्पर्धेतील निवडक स्पर्धकांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजभवन येथे आपले प्रकल्प सादर केले. एकूण २७ विद्यार्थी यात सहभागी होते त्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाच विद्यार्थ्यांनी राजभवन येथे सादरीकरण केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित हे सादरीकरण पाहण्यासाठी राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक मोठे उद्योगपती उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रथमेश खेडकर या विद्यार्थ्याने कांदा साठवणूक करण्याचे नवे तंत्र या विषयावर संशोधन केले आहे. तर निखिल जाधव या विद्यार्थ्याने कॉस्ट इफेक्टिव डिजिटल मायक्रोस्कोप बनविला आहे. ऐश्वर्या पवार या विद्यार्थिनीने फर्टीलायजर स्फेअर्स या विषयात संशोधन केले आहे.
अमोल सोनवणे या विद्यार्थ्याने न्युक्लिअर बॅटरी फॉर स्पेस ॲप्लिकेशन या विषयावर संशोधन केले आहे तर अवंती पुराणिक या विद्यार्थिनीने सॅनेटरी पँड या विषयावर संशोधन केले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ.संजय ढोले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना भगतसिंह कोश्यारी आणि एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com