राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान

President Draupadi Murmu confers NSS Awards 2020-21 at Rashtrapati Bhawan राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

President Draupadi Murmu confers NSS Awards 2020-21 at Rashtrapati Bhawan

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान

महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात २०२०-२१ या वर्षासाठीचे NSS अर्थात, राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान केले. आज एकूण बेचाळीस पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात, दोन विद्यापीठं, NSS चे दहा गट, त्यांचे कार्यक्रम अधिकारी, आणि NSS च्या ३० स्वयंसेवकांचा समावेश आहे. यावेळी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.President Draupadi Murmu confers NSS Awards 2020-21 at Rashtrapati Bhawan राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा कार्य विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान केले जातात. विद्यापीठं आणि महाविद्यालयं, NSS गट आणि त्यांचे कार्यक्रम अधिकारी, तसंच NSS चे स्वयंसेवक यांनी स्वेच्छेनं केलेल्या समाजसेवेची ओळख निर्माण होऊन, त्या अनुषंगानं देशात NSS ला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात.

महाराष्ट्रातील कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान

महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सुशील शिंदे यांच्यासह प्रतिक कदम आणि दिवेश गिन्नारे या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुशील शिंदे हे मुंबईच्या कांदिवली भागातील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी आहेत. त्यांना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्‍याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिक हा नंदुरबार येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचा  विद्यार्थी आहे.  दिवेश हा नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. या दोघांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या श्रेणीत देशातील एकूण 10 कार्यक्रम अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. यात मुंबई येथील कार्यक्रम अधिकारी सुशील शिंदे यांचाही गौरव करण्यात आला त्यांनी ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चैताली चक्रवर्ती यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वरूप श्री. शिंदे यांना रजतपदक, प्रमाणपत्र आणि  दीड लाख रुपये तर डॉ. चक्रवर्ती यांना चषक आणि 2 लाख रुपये प्रदान करण्यात आले.

श्री. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कंपोस्टिंग, ऊर्जा संरक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केले. शेतकऱ्यांनी  पिकविलेल्या सेंद्रीय उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, रक्तदान शिबीर आयोजन आणि वृक्षारोपण क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवकांच्या श्रेणीत देशभरातील 30 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या श्रेणीत महाराष्ट्रातून नंदुरबार येथील प्रतिक कदम आणि नागपूर येथील विद्यार्थी दिवेश गिन्नोर यांनाही गौरविण्यात आले. प्रत्येकी रजतपदक, प्रमाणपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रतिक कदम यांनी वन्यजीव संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी 4 हजारांहून अधिक सापांचा तसेच, मोर आणि बिबट्यांच्या पिलांचा जीव वाचवून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले. कोविड महामारीच्या काळात स्वत: मास्क तयार करून गरजूंना त्याचे वाटप केले. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जनजागृती करुन त्यांनी  लसीकरणाबाबत नागरिकांना प्रोत्साहित केले. त्यांनी रक्तदान आणि वृक्षारोपण कार्यक्रमात उल्लेखनीय योगदान दिले आहे.

दिवेश गिन्नारे यांनी शासनाच्या सांप्रदायिक सौहार्द निधीमध्ये 11 हजार 688 रुपये  गोळा करून जमा केले. गिन्नारे यांनी  विविध जनजागृतीविषयक कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेतला.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *