President Gotabaya Rajapaksa decides to step down in the wake of Sri Lanka’s economic crisis
श्रीलंकेत उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पायउतार होण्याचा राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्ष यांचा निर्णय
कोलंबो : श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष यांनी अखेर पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेत उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर निदर्शनं सुरू असून काल संतप्त नागरिकांनी राजपक्षे यांच्या सरकारी निवासस्थानाकडे धाव घेतली. त्यांनी पंतप्रधानांच्या घरालाही आग लावली.
राजपक्ष यांनी 13 तारखेला राजीनामा देण्याचं जाहीर केलं असून पंतप्रधान पी एम विक्रमसिंघेही राजीनामा देतील. संसद प्रवक्ता महिंदा अभयवर्धना यांनी जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं असून अध्यक्ष देशहितासाठी पद सोडत असल्याचं सांगितलं.
श्रीलंकेत अभूतपूर्व चलनवाढ, अन्न, इंधन आणि औषध टंचाई निर्माण झाली असून त्रस्त झालेले श्रीलंकेचे नागरिक नवीन युगाचा प्रारंभ होण्याची गरज असल्याचं म्हणत आहेत.
श्रीलंकेत राष्ट्रपतींचं निवासस्थानी हजारो आंदोलनकर्त्यांचा मोर्चा
श्रीलंकेमधल्या तीव्र आर्थिक संकटानंतर काल राजधानी कोलंबोत लोकांचा उद्रेक पाहायला मिळाला. हजारो संतप्त आंदोलनकर्त्यांनी आज राष्ट्रपतींचं निवासस्थान आणि कार्यालयावर मोर्चा काढला. हा जमाव अनियंत्रित होण्याची शक्यता गुप्तचर विभागनं वर्तवल्यानंतर राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांना लष्करी मुख्यालयात हलवलं असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे.
राष्ट्रपतींच्या निवासस्थानासमोर हजारो आंदोलनकर्त्यांनी श्रीलंकेचा राष्ट्रध्वज घेऊन आंदोलन केलं. यावेळी त्यांनी हेल्मेटही घातले असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या वेळी आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रपतींना पायउतार होण्याच्या घोषणा दिल्या. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींना कालच राष्ट्रपती भवनातून हलवण्यात आलं होतं असं लष्करी सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान प्रधानमंत्री रानील विक्रमसिंगे यांनी या परिस्थीवर चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची एक तातडीची बैठक बोलावली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल पासून कोलंबोत संचारबंदी लावण्यात आली होती.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “श्रीलंकेत उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पायउतार होण्याचा राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्ष यांचा निर्णय”