Prime Minister celebrated Diwali in Kargil with army
प्रधानमंत्र्यांची दिवाळी कारगिलमधे लष्करासोबत साजरी
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कारगिल मध्ये लष्कराच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. नवीन भारत ही संकल्पना म्हणजे केवळ एक देश नसून त्याग, प्रेम, करुणा, प्रतिभा, धैर्य, शौर्य आणि शांती यांचं मिश्रण आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं.
“अनेक वर्षांपासून आपण सर्वजण माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात”
“दिवाळी हा दहशतवाद संपवण्याचा उत्सव आहे”
“आपण ज्या भारताचा आदरपूर्वक उल्लेख देतो तो केवळ एक भौगोलिक प्रदेश नसून तर एक जागृत आत्मा, एक अखंड चेतना, आणि एक चिरंतन अस्तित्व आहे”
“देशांतर्गत शत्रूंवर कठोर कारवाई करत असताना तुम्ही सीमेवर देखील संरक्षक ढाल बनून उभे आहात”
“400 पेक्षा जास्त संरक्षण उपकरणे यापुढे परदेशातून विकत घेतली जाणार नाहीत आणि आता ती भारतातच बनवली जातील”असा निश्चय करणाऱ्या आमच्या सशस्त्र दलांची मी प्रशंसा करतो: पंतप्रधान
“नवीन आव्हाने, नवीन पद्धती आणि राष्ट्रीय संरक्षणाच्या बदलत्या नव्या आवश्यकतांनुसार आम्ही देशाच्या लष्कराला सामर्थ्यशाली बनवत आहोत”परंतु प्रत्येक संकटावर मात करून भारतीय संस्कृती अजूनहि टिकून आहे. देशभक्ती ही देवभक्ती समान आहे असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी लष्कराचं कौतुक केलं.
कारगीलची युद्धभूमी ही भारतीय सैन्याच्या साहसाचा झगमगता प्रज्वलित पुरावा आहे. द्रास, बटालिक आणि टायगर हिल ही क्षेत्रे म्हणजे भारतीय सशस्त्र दलाचे धैर्य आणि शौर्यापुढे पर्वतांवर ठाणे देऊन बसलेला शत्रु किती खुजा ठरला, याचा पुरावा आहे, असे उद्गार मोदींनी काढले.
भारतीय सीमांवर पहारे देणारे सैनिक म्हणजे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे संवेदनक्षम स्तंभ आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, एखादा देश तेव्हाच सुरक्षित असतो जेव्हा त्याच्या सीमा सुरक्षित असतात, त्याची अर्थव्यवस्था मजबूत असते आणि समाज आत्मविश्वासाने ठासून भरलेला असतो.
देशाच्या ताकदीबाबत आम्ही जेव्हा ऐकतो तेव्हा संपूर्ण देशाचे नीतीधैर्य ओसंडून वाहू लागते, असेही पंतप्रधान म्हणाले. देशवासियांमध्ये असलेल्या दृढ ऐक्याच्या भावनेबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान आणि वीज तसेच पाण्याची सुविधा असलेल्या पक्क्या घरांचे जवानांच्या कुटुंबांना योग्य वेळेत केलेले वितरण ही उदाहरणे दिली.
प्रत्येक जवानाला त्याबद्दल अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. जेव्हा अगदी दूरवर असलेल्या जवानांच्या घरांमध्ये या सेवा पोहचतात, तेव्हा त्यांना आगळे समाधान लाभते, असे पंतप्रधानांनी सांगितले.
कारगिलमध्ये लष्कराच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना प्रधानमंत्री म्हणाले कि जगभरात विविध संस्कृती विकसित झाल्या आणि त्यांचा अंत सुद्धा झाला. कारगिलच्या विजयी भूमीवरून त्यांनी देशवासीयांना आणि जगाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
कारगिलमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचं तळ उद्ध्वस्त केल्याचं त्यांनी सांगितलं . प्रधानमंत्र्यांनी लष्कराच्या अतुलनीय शौर्याचं कौतुक केलं आणि सैनिकांच्या शौर्याचा देशाला अभिमान वाटतो असं त्यांनी यावेळी म्हटलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com