धर्म, जात आणि भाषेच्या आधारे देशात फूट पाडू पाहणाऱ्या नकारात्मकतेपासून दूर राहण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

Prime Minister Narendra Modi at the Statue of Unity पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

Prime Minister’s appeal to stay away from negativity that seeks to divide the country on the basis of religion, caste and language

धर्म, जात आणि भाषेच्या आधारे देशात फूट पाडू पाहणाऱ्या नकारात्मकतेपासून दूर राहण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

केवडिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले.Prime Minister Narendra Modi at the Statue of Unity पंतप्रधान नरेंद्र मोदी  स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे  हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

आपल्या भाषणाच्या सुरूवातीला पंतप्रधानांनी मोरबी येथील पीडितांप्रति तीव्र दुःख व्यक्त केले. आपण केवडियात असलो तरी आपले मन मात्र मोरबी येथील अपघातातील पीडितांकडे आहे, असे ते म्हणाले.

एकीकडे आपले अंत:करण दुःखाने भारले आहे, तर दुसरीकडे कर्म आणि कर्तव्याचा मार्ग आहे. या कर्तव्य आणि जबाबदारीच्या भावनेतूनच आपण राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

देशाला धर्म, जात आणि भाषेत विभाजित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नकारात्मकतेपासून दूर राहण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज गुजरातमधील केवडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं राष्ट्रीय एकता दिवस संचलन झालं, त्यावेळी ते बोलत होते.

सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांनी पुतळ्याला पुष्पांजली वाहिली. याप्रसंगी संबोधित करताना प्रधानमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय एकता दिवस ही आपल्या देशाला एकत्र आणण्यात सरदार पटेलांच्या अमूल्य भूमिकेला श्रद्धांजली आहे.

सरदार पटेल यांच्या संकल्पनेनुसार सर्व नागरिकांना समान संधी देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं हे केंद्र सरकारच्या सर्व धोरणांचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.

एकता दिवस परेडमध्ये बीएसएफ आणि पाच राज्य पोलीस दलांच्या तुकड्यांचा सहभाग होता. तुकड्यांव्यतिरिक्त, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मधले सहा पोलीस क्रीडा पदक विजेतेदेखील या परेडमध्ये सहभागी झाले होते.

मोरबी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *