देशभरात खासगी लसीकरण केंद्रांवर १८ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी सशुल्क वर्धक मात्रा द्यायला सुरुवात

Private immunization centres across the country have started offering paid increments for citizens above 18 years of age

देशभरात खासगी लसीकरण केंद्रांवर १८ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी सशुल्क वर्धक मात्रा द्यायला सुरुवातCOVID 19 Preventive Vaccination Campaign हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

नवी दिल्ली : देशभरात आजपासून खासगी लसीकरण केंद्रांवर १८ पेक्षा अधिक वयाच्या पात्र लाभार्थ्यांकरता कोविड १९ प्रतिबंधक लसीच्या वर्धक मात्रेसाठीचं लसीकरण सुरु झालं.

ज्यांचं वय १८ वर्षापेक्षा जास्त आहे, आणि ज्यांनी कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेऊन ९ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा घेता यईल.

याशिवाय सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये सुरु असलेला मोफत कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम तसाच सुरु राहील. या अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना पहिली आणि दुसरी मात्रा, तर आरोग्य कर्मचारी, आघाडीवर राहून काम करत असलेले कोरोना योद्धे आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना वर्धक मात्रा, विनामूल्य दिली जाईल.

दरम्यान देशातल्या १५ पेक्षा जास्त वयाच्या ९६ टक्के पात्र लाभार्थ्यांना लसीची किमान एक तर ८३ टक्के लाभार्थ्यांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. यासोबतच १२ ते १४ वर्ष या वयोगटातल्या ४५ टक्क्याहून अधिक पात्र लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्र मिळाली आहे.

Hadapsar News Bureau.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *