Government announcement to start the process of filling 75 thousand vacancies in government jobs
शासकीय नोकऱ्यांमधली ७५ हजार रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सरकारची घोषणा
मुंबई : स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध शासकीय नोकऱ्यांमधली ७५ हजार रिक्त पदं येत्या वर्षभरात भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असं उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं.
राज्य सरकारच्या २९ प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा आणि पदोन्नतीची मिळून २ लाख १९३ पदं रिक्त असल्यासंदर्भात लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मांडली होती त्यावर ते उत्तर देत होते. एमपीएससी मार्फत १०० टक्के पदं भरण्याची आणि आणि अन्य माध्यमातून ५०टक्के पदं भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे प्रलंबित असलेल्या नियुक्त्यांपैकी बाराशे पदांवर नियुक्त्या देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उर्वरित नियुक्त्या देण्यात येतील. अशी माहिती देसाई यांनी दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com