प्रा.अभय टिळक यांची विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाला २५ लाखांची देणगी

Prof. Abhay Tilak's donation of 25 lakhs to the Alumni Association of the University प्रा.अभय टिळक यांची विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाला २५ लाखांची देणगी हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Prof. Abhay Tilak’s donation of 25 lakhs to the Alumni Association of the University

प्रा.अभय टिळक यांची विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाला २५ लाखांची देणगी

विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख व अर्थतज्ज्ञ प्रा.अभय टिळक यांनी २५ लाख रुपयांची देणगीProf. Abhay Tilak's donation of 25 lakhs to the Alumni Association of the University
प्रा.अभय टिळक यांची विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाला २५ लाखांची देणगी
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज 
Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एसपीपीयु अल्युमिनाय असोसिएशनला (माजी विद्यार्थी संघ) विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख व अर्थतज्ज्ञ प्रा.अभय टिळक यांनी २५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी ही देणगी दिली आहे.

या निमित्त माजी संघाच्या वतीने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, विद्यापीठाचे सल्लागार राजेश पांडे, माजी विद्यार्थी संघाच्या सल्लागार समितीचे सदस्य कृष्णकुमार गोयल, अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, डॉ.दीपक माने, विद्यार्थी संघाचे संचालक डॉ.संजय ढोले, व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर, धोंडीराम पवार, अधिसभा सदस्य , प्रसेनजीत फडणवीस, राहुल पाखरे, मुकुंद पांडे, कृष्णा भंडलकर, व्यवस्थापन शास्त्र विभाग प्रमुख सुप्रिया पाटील, डॉ.संजय चाकणे आदी यावेळी उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघाचे संपर्क अधिकारी प्रतीक दामा यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

प्रा. अभय टिळक अर्थतज्ज्ञ असून विविध विभागांमध्ये तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून काम करतात. तसेच वारकरी संप्रदायाचे अभ्यासक म्हणूनही त्यांची ख्याती आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी सर्व जगभरात कार्यरत आहेत. त्यांना एकत्रित आणण्याचे काम विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाकडून केले जात आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *